Breaking News

मासेमारी करणार्‍या यांत्रिकी नौकांवर धडक कारवाई

उरण ः प्रतिनिधी

शासनाने यांत्रिकी नौकांद्वारे खोल समुद्रातील मासेमारीला महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बंदी घातली आहे, मात्र असे असतानाही या बंदी आदेशाचे उल्लंघन करून खोल समुद्रात मासेमारी करून आलेल्या सहा मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981चे कलम 4नुसार कारवाई करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली उरणचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांनी ही कारवाई केली. उरण तालुक्यातील करंजा व करंजा टर्मिनल्स या ठिकाणी धाड टाकून ही कारवाई करण्यात आली.

यामध्ये देवी कुलस्वामिनी नौका क्र.-आयएनडी-एमएच-7-एमएम-665, जय मल्हार साईराज नौका क्र.-आयएनडी-एमएच-7-एमएम-422, श्री समर्थ कृपा नौका क्र.- आयएनडी-एमएच-7-एमएम-31, आई माऊली नौका क्र.-आयएनडी-एमएच-7-एमएम -38, जय शिवसाई सागर नौका क्र.-आयएनडी-एमएच-7-एमएम-553, सद्गुरू कृपा नौका क्र.-आयएनडी-एमएच-7-एमएम-1629 आदी नौकांचा समावेश आहे. या वेळी सर्व यांत्रिकी मासेमारी नौका जप्त करण्यात आल्याची माहिती परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांनी दिली.

Check Also

तुपगावच्या कार्यकर्त्यांचा भाजपत जाहीर प्रवेश

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत मोहोपाडा : प्रतिनिधी उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या …

Leave a Reply