Breaking News

रोह्यात आढळले तब्बल 10 कोरोना पॉझिटिव्ह

रोहे ः प्रतिनिधी

कोरोनाचे संकट देश व राज्यभर वाढत असताना देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी रोहा तालुक्यातही कोरोनाने हातपाय पसरले आहेत. रोह्यात रविवारीएकाच दिवसात 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्हपैकी एकाचा रोह्यात व्यवसाय असल्याने खबरदारी म्हणून रोहा आणि कोलाड बाजारपेठ काही दिवस बंद ठेवण्यात आली आहे.

Check Also

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून कामठा अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण

उरण : वार्ताहरआमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नातून आणि आमदार स्थानिक विकास निधी (२०२५-२६) अंतर्गत …

Leave a Reply