Breaking News

निष्क्रिय आघाडी सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली

विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर कडाडले

महाड : प्रतिनिधी
पीक कर्जमाफीत फसवणूक, 50 हजारांची प्रोत्साहन रक्कम नाही, बांधावर बियाणे-खत नाही. या महाआघाडी सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानभरपाईच्या वाटपाबाबत आढावा घेण्यासाठी ते महाड येथे आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
आमदार दरेकर म्हणाले की, महाआघाडी सरकार कोरोना महामारी निर्मूलन आणि निसर्ग चक्रीवादळात कोकणाला सावरण्यात अपयशी ठरले आहे. त्यातच पीक कर्जमाफीत फसवणूक करून शेतकर्‍यांना 50 हजारांची प्रोत्साहन रक्कम दिली गेली नाही. शेतकर्‍यांच्या बांधावर बियाणे-खत पोहोचविले नाही. या सरकारने शेतकर्‍यांची घोर फसवणूक केली आहे.
आमदार दरेकर यांच्यासोबत आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, राजेय भोसले, जयवंत दळवी, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार उपस्थित होते. प्रांत कार्यालयात शासकीय अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. लॉकडाऊननंतर आलेली अवास्तव वीज बिले लोकांचे तक्रार अर्ज न घेता परस्पर दुरुस्त करावीत, अशी सूचना आमदार दरेकर यांनी या वेळी केली तसेच निसर्ग चक्रीवादळाग्रस्तांना मदत तुटपुंजी आहे. ती सरकारने वाढवून द्यावी व फेरपंचनामे करावेत, अशी मागणी केली. महाड-विन्हेरे-नातुनगर-खेड मार्ग त्वरित सुरू करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या, तर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून किल्ले रायगडावरील खंडीत वीजपुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली व तशा सूचना अधिकार्‍यांना केल्या.
कोविड योद्ध्यांचा सन्मान
विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, डॉ. बिराजदार, डॉ. हिंमतराव बावस्कर, डॉ. आदित्य महामुणकर, डॉ. मिंडे, पोलीस निरीक्षक शैलेश सणस, उपनिरीक्षक पंकज गिरी, तहसीलदार चंद्रसेन पवार, डॉ. अन्सारी, डॉ. सुकाळे, यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply