जिल्ह्याधिकार्यांकडून अधिसूचना जारी; नागरिक संभ्रमात
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता, मात्र जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना जारी करीत हा लॉकडाऊन 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक संभ्रमात पडले आहेत.
रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी 13 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण जिल्ह्यात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून टाळेबंदी करण्यात आली आहे, असे जाहीर केले होते. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे या प्राधीकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा 13 मार्च 2020 रोजी लागू केला आहे. त्यामुळे या कालावधीत सर्व बाबतीत आदेश काढण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लॉकडाऊनचा लेखी आदेश काढला आहे. जिल्हाधिकारी चौधरी यांनी जो अध्यादेश काढला आहे त्यात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन असेल असे म्हटले आहे. पालकमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी त्यांनी दोन दिवसांनी वाढवला आहे.
दुसरीकडे लॉकडाऊन संपूर्ण जिल्ह्यात म्हणजेच 15 तालुक्यांमध्ये लागू असेल, असे पालकमंत्री तटकरे यांनी सांगितले होते, पण जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या अध्यादेशात रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात ही टाळेबंदी असेल असे म्हटले आहे. पनवेल व उरण या दोन तालुक्यांचा महसुली रायगड जिल्ह्यात समावेश होतो, परंतु हे दोन्ही तालुके नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे या दोन तालुक्यांना 15 जुलैपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये वगळण्यात आले आहे का, हे स्पष्ट होत नाही. परिणामी पनवेल व उरण तालुक्यातील जनता संभ्रमात पडली आहे. दरम्यान, या तालुक्यांसाठी जिल्हाधिकार्यांच्या सहमतीने प्रांताधिकार्यांनी आदेश काढल्याचे समजते.
अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाच इंधन
लॉकडाऊन काळात किराणा, भाजीपाला, चिकन, दूध यांची घरपोच सेवा सुरू राहणार आहेत तसेच दारूच्या घरपोच सेवेलाही परवानगी असणार आहे, मात्र पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना इंधन मिळणार आहे. दरम्यान, अत्यावश्यक असेल आणि घराबाहेर पडत असाल तेव्हा मास्क अनिवार्य आहे तसेच दैनंदिन काम करताना सुरक्षित अंतर ठेवून काम करावे, असे निर्देश आहेत.
सलग लॉकडाऊनमुळे पनवेलचे नागरिक हैराण
पनवेल : बातमीदार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीत 4 ते 13 जुलैदरम्यान लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यातच आता संपूर्ण जिल्ह्यात 15 ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पनवेलमधील नागरिकांना सलग 23 दिवस लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येथील जनतेतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
पहिल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनला पनवेलमधील नागरिकांचा विरोध नव्हता. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी सर्वांनी त्यास सहकार्य केले, मात्र नंतर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पनवेलचा लॉकडाऊनही वाढला. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये पुरेल इतके खरेदी केलेले वाणसामान आता संपत चालले आहे. एकवेळ किराणा मिळेल, पण भाजीचे काय, असा प्रश्न गृहिणींना सतावत आहे. ज्या काही भाज्या सध्या पदपथावर मिळतात त्या चढ्या भावाने विकल्या जातात. शिवाय त्या खराबही असतात. त्यामुळे खायचे काय, हा प्रश्न आहे.
दुसरीकडे वारंवार लॉकडाऊन घेतल्यामुळे हातावर पोट असणार्यांना उपासमार सहन करावी लागत आहे, तर सर्वच दुकाने बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना खायला-प्यायला मिळणेही मुश्कील झाले आहे. प्रशासनाने केलेली घरपोच किराणा सुविधा तितकीशी यशस्वी होताना दिसत नाही. त्याऐवजी नागरिकांना खरेदीसाठी अवधी देणे संयुक्तिक ठरले असते.
पनवेल परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज शंभर ते दीडशेच्या वर जाऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. केवळ वारंवार लॉकडाऊन करून हा प्रश्न सुटणार नाही. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन व उपाययोजना करून रुग्णसंख्या कमी करावी, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.