Breaking News

मध्यरात्रीच्या ध्वजारोहणास कर्जतकरांचा उदंड प्रतिसाद

कर्जत : प्रतिनिधी

तालुका मराठी पत्रकार संघ आणि कर्जत प्रेस क्लब यांच्या संयुक्तवतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतमधील नागरिकांनी कोरोना संकटाची भीती न बाळगता मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला. 

कर्जतच्या स्वर्गीय भाऊसाहेब राऊत चौकात 14 ऑगष्ट रोजी मध्यरात्री ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. चौकाच्या नामफलकाला नगरसेवक संकेत भासे यांनी पुष्पहार अर्पण केला. तर इंडियन नेव्हीचे निवृत्त कमांडर बिपीन मिस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. त्यांनतर बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी निवृत्त जवान दगडू धुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माझ्या 75 वर्षांच्या जीवनात मला पहिल्यांदाच मध्यरात्रीच्या ध्वजारोहणासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली, हा उपक्रम गेली सतरा सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे, असे बिपीन मिस्त्री यांनी या वेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाडिले यांनी केले. कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय मांडे, वैदेही पुरोहित, माजी नगराध्यक्ष रजनी गायकवाड, नगरसेविका मधुरा चंदन, हेमंत ठाणगे, भाजप किसान मोर्चा कोंकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे तसेच राजाभाऊ कोठारी, जे. एम. मिर्झा, मुकेश सुर्वे,संदीप पाटील, राहुल तिटकारे, मुफद्दल डाभिया, विनायक उपाध्ये, कल्पेश शहा, पंकज पाटील, प्रभाकर गंगावणे, अरुण निघोजकर, मनोहर गोरेगावकर, वसंत मोधळे, असीफ मिर्झा, रामदास गायकवाड, आत्माराम निघोजकर, मंदार दगडे, अभिजीत रेणोसे, ज्ञानेश्वर बागडे, मुस्तन कर्जतवाला, फातिमा कर्जतवाला, विनया उपाध्ये, अनिता गोरेगावकर आदिंसह देशप्रेमी नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रविवारी सकाळी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात    तहसील कार्यालयात तहसीलदार विक्रम, उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी अजित नैराळे,  पोलीस ठाण्यात निरीक्षक अरुण भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत दिवाणी न्यायालयात न्यायाधीश मुनोद तोकले, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत कार्यालयामध्ये उपअभियंता अजयकुमार सर्वगोड, कोंकण ज्ञानपीठ महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य प्रा. चंद्रकांत गोंधळी, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान, फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मोहन काळे, इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये कार्याध्यक्ष डॉ. अनिरुद्ध जोशी, अभिनव ज्ञान मंदिर संस्थेमध्ये कार्यवाह जनार्दन मोघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply