Breaking News

नवीन पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस

पनवेल ः प्रतिनिधी

पतंजली योग समिती पनवेल व रामशेठ ठाकूर विचार मंच यांच्या वतीने नवीन पनवेल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस (21 जून) साजरा करण्यात येणार आहे. 

संयुक्त राष्ट्राने 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील 175 देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

भारतातील ही 5000 वर्षे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. पनवेल परिसरातील नागरिकांना सामूहिक योगाभ्यास करता यावा, या उद्देशाने नगरसेवक संतोष शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. सेक्टर-8 येथील गोकुळ डेरीसमोरील भूखंड येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या कार्यक्रमाचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी आर. पी. यादव, प्रभाग समिती सभापती संजय भोपी, नगरसेवक समीर ठाकूर, अ‍ॅड.  मनोज भुजबळ, एकनाथ गायकवाड, प्रकाश बिनेदार, तेजस कांडपिळे, महादेव मधे. चारूशीला घरत, राजश्री वावेकर, सुशिला घरत, सीताताई पाटील, वृषाली वाघमारे, कुसुम पाटील, किशोर चौतमोल, भास्कर शेट्टी, जितेंद्र तिवारी, संतोष बहन, हरीष रावल, रवींद्र मोरे आदी उपस्थित राहणार आहेत.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply