तीन जणांचा मृत्यू; 228 रुग्णांची संसर्गावर मात
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 21) कोरोनाचे 156 नवीन रुग्ण आढळले असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 228 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 112 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 137 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 44 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 51 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
खारघर सेक्टर 1 माऊली सदन, खांदा कॉलनी, नवरत्न सोसायटी आणि पनवेल लाइन आळीतील अक्षता सोसायटीमधील व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी कळंबोलीत 18 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 877 झाली आहे. कामोठ्यात 25 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1077 झाली आहे. खारघरमध्ये 23 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 990 झाली आहे.
नवीन पनवेलमध्ये 10 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 831 झाली आहे. पनवेलमध्ये 13 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1023 झाली. तळोजामध्ये 23 नवीन रुग्ण आढळून तेथील रुग्णांची संख्या 304 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 5102 रुग्ण झाले असून 3546 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.50 टक्के आहे. 1435 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन 44 रुग्ण आढळले. त्यामध्ये उलवे 11, करंजाडे 10, सुकापूर तीन, विचुंबे, पळस्पे, भिंगार व आदई दोन, आकुर्ली, डेरवली, घोसाळवाडी, कोळवाडी, मोहो, गव्हाण, चेरवली, चिंध्रण, देवद, दिघाटी, पेडगाव आणि खानवळे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे, तसेच 51 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
रोह्यात 17 कोरोना रुग्ण
रोहे ः प्रतिनिधी
रोहा शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. येथे दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येने येथे दुहेरी आकडा गाठला आहे. मंगळवारी (दि. 21) रोहा तालुक्यात 17 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे.
दरम्यान, रोहा शहरातील खालचा मोहल्ला धावीर रोड येथील 53 वर्षीय व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला, तर 15 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
रोहा तालुक्यात मंगळवारी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा 375वर पोहचला आहे. शहरातील खालचा मोहल्ला धावीर रोड येथील 53 वर्षीय व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाल्याने रोहा तालुक्याचा मृत्यूचा आकडा नऊवर पोहचला आहे. मंगळवारी 15 व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने बर्या होणार्यांची संख्या 287वर पोहचली आहे. सध्या रोहा तालुक्यात 79 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.