Saturday , June 3 2023
Breaking News

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्मशानभूमी स्वच्छता अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त

जागतिक हवामान दिनाचे औचित्य डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 24) स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यास श्रीसदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने स्वच्छता अभियान राबविण्यात येत असते. त्यापुढे जाऊन रविवारी श्रीसदस्यांनी ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील स्मशानभूमींची स्वच्छता करीत समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. या अभियानात ठिकठिकाणच्या स्मशानभूमी परिसरात साफसफाई करून जमा झालेल्या कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे परिसर स्वच्छ झाल्याचे पाहावयास मिळाले.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply