Breaking News

रायगडातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 2पर्यंत सुरु राहणार : जिल्हाधिकारी

अलिबाग : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लॉकडाऊनच्या काळात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे विक्री दुकाने/आस्थापना सकाळी 6 ते सकाळी 11 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र आता मूळ लॉकडाऊन आदेशात सुधारणा करुन रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे इ. दुकाने/आस्थापना यापुढे सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु  ठेवण्यास  जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मान्यता दिली आहे.
तसेच समुद्रकिनारी, सार्वजानिक/खाजगी क्रीडांगणे, सोसायटी/संस्था यांच्या अखत्यारितील मैदाने, उद्याने इत्यादीसह जवळच्या सार्वजानिक खुल्या जागेत वैयक्तिक स्वरुपात शारीरिक व्यायाम उदा. सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉकिंग हे व्यायाम योग्य शारिरीक अंतर ठेवून सकाळी 5 ते सायं.8 या वेळेतील ठराविक कालावधीसाठी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply