Breaking News

किरीट सोमया यांनी घेतली कोर्लई ग्रामपंचायतीकडून माहिती

ठाकरे-वायकरांचा मालमत्ता घोटाळा

रेवदंडा ः प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मालमत्ता खरेदी घोटाळ्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी (दि. 3) मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीला भेट दिली.
रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर या परिवारांनी वास्तुविशारद कै. अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या कोर्लई गावातील 19 बंगले मिळकत व्यवहारात घोटाळा झाला असल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे. या संदर्भात त्यांनी 31 मे 2021 रोजी माहिती कायद्यांंतर्गत कोर्लई ग्रामपंचायतीकडे माहितीची मागणी केली होती, पण जून महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोर्लई गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे सोमय्या यांनी त्या वेळी मुरूडच्या तहसीलदारांची भेट घेत मालमत्ता घोटाळ्यासंबंधी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे या संदर्भात माहिती प्राप्त व्हावी यासाठी 4 जून रोजी कोर्लई ग्रामपंचायतीचे माहिती कायद्याच्या आधारे पुन्हा लक्ष वेधले होते.
कोर्लई ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसेवक जितेंद्र म्हात्रे यांनी त्या माहितीसाठी 2 जून रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात हजर रहावे, असे पत्र किरीट सोमय्या यांना दिले होते. त्यानुसार सोमय्या यांनी या ग्रामपंचायतीस भेट दिली आणि ठाकरे-वायकर यांनी नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांबाबत माहिती घेतली. या भेटीत सोमय्या यांच्यासमवेत भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply