अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून 60 ते 70 गावांना पाणी पुरवठा केला जातो. बुधवारी पाण्याच्या टाकीत मृतदेह असल्याचे कर्मचार्यांच्या लक्षात आले. यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐन कोरोना संकटाच्या काळात ही घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ऐन पावसाळ्यात या परिसरातील गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काशीनाथ हंबीर (वय 40) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. 3 ते 4 दिवसापूर्वी तो व्यक्ती टाकीत पडला असल्याची माहिती आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …