Breaking News

‘बार्टी’तर्फे अनुसूचित जातींचे सर्वेक्षण

मुरूड : प्रतिनिधी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या मार्फत राज्यात गावनिहाय अनुसूचित जातीचे सर्वेक्षण करण्यात येत असून, रायगड जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींचे गावनिहाय सर्वेक्षण समतादूत करीत आहेत.

समतादूतांनी जिल्ह्यातील 15 पैकी सहा तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन गावांतील सविस्तर माहिती संकलित केली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींच्या विकासासाठी अधिक चांगल्या प्रकारे उपक्रम राबविणे शक्य होणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीतही आरोग्याची काळजी घेऊन व सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून समतादूत हे बार्टी संस्थेचे उपक्रम तालुक्यात राबवित आहे. यात सामाजिक संघटनाची माहिती संकलित करणे. एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षाच्या ऑनलाइन कोचिंग क्लाससाठी रजिस्ट्रेशन करण्यास मार्गदर्शन करणे आदींचा समावेश आहे. ‘बार्टी’चे महासंचालक कैलास कणसे, मुख्य प्रकल्प संचालक प्रज्ञा वाघमारे, प्रकल्प अधिकारी सचिन नांदेडकर, समतादूत वैशाली पेरवे, मनीषा कळके, अमोल म्हात्रे, रश्मी भोईर, अनुजा पाटील, रागिणी साखरकर, राहुल गायकवाड, सदानंद जाधव यात सहभागी आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply