रविवारी आढळले 82 रुग्ण; एकूण संख्या 674 वर
नेरुळ : बातमीदार
नवी मुंबईत कोरोना बधितांची संख्या वाढत असून रविवारी (दि. 10) एकाच दिवसात 82 रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 674 झाली आहे. शनिवारपर्यंतचा एका दिवसात रुग्ण वाढीचा हा सर्वोच्च आकडा असल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेला कठोर पाऊले उचलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. रविवारी एकूण 354 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 272 निगेटिव्ह तर 82 पॉझिटिव्ह आले. यामध्ये बेलापूर 3, नेरुळ 7, वाशी 21, तुर्भे 20, कोपरखैरणे 14, घणसोली 5, ऐरोली 8 व दिघा 4 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह झालेल्यांची रुग्णांची एकूण संख्या 155 असून मात्र रविवारी एकाच दिवसांत 80 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तेवढीच दिलासादायक बाबदेखील समोर आली आहे. कोरोनाने बळी झालेल्या रुग्णांतदेखील वाढ झाली असून ही संख्या 14 वर पोहोचली आहे.