Breaking News

सीवूड्समध्ये कृत्रिम तलाव निर्माण करा; भाजपच्या दत्ता घंगाळे यांची मागणी

नवी मुंबई : बातमीदार

भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन सीवूड्समधील प्रश्न मांडले. यात आगामी कोरोना कालावधीतील गणेशोत्सव लक्षात घेऊन सेक्टर 46 येथील मैदानात विसर्जनासाठी कुत्रिम तलावाची निर्मिती करण्याची मागणी केली. त्यासोबत प्रभाग क्रमांक 111 मधील सेक्टर 44 येथील सबवे पासून जाणारा रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले असून तो रस्ता दुरुस्त करावा. सीवूड्स परिसरातील व्यापारी दुकानदार यांचा दुकानाची वेळ 9 ते 5 ऐवजी संध्याकाळी 8 पर्यंत वाढवावी. जेणेकरून अत्यावश्यक सेवेवरून सायंकाळी उशिरा घरी येणार्‍या कर्मचार्यांस त्याचा फायदा होईल. या वेळी विकास नलावडे, वॉर्ड अध्यक्ष 109 कैलास तरकसे, सीवूड्स व्यापारी असोसिएशनचे लालजीभाई बंगारी, दिनेश चौधरी, हरजित हंजरा, अरविंद गामी, पंकज पाचपुते, उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply