पनवेल : रायगड जिल्ह्यात 14 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 9) झाली असून, 427 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 304 रुग्ण बरे झाले आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, पेण व उरण प्रत्येकी दोन, तसेच खालापूर व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल (महापालिका 206, ग्रामीण 41) तालुक्यात 247, अलिबाग 54, पेण 30, खालापूर 24, रोहा 16, माणगाव 15, उरण 14, महाड 11, पेण व श्रीवर्धन प्रत्येकी पाच, मुरूड तीन, सुधागड दोन आणि पोलादपूर तालुक्यात एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 18,564 आणि मृतांची संख्या 504 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 14,681 जणांनी कोरोनावर मात केल्याने 3379 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …