Breaking News

घराच्या छताचे प्लास्टर कोसळले

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईमध्ये सध्या घरातील छत पडण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रविवारी (दि. 16) सीबीडी बेलापूर सेक्टर 4 या इमारतीतील ग बी, 10/11/4:1 या घराच्या छताचे प्लास्टर कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणासही दुखापत झाली नसली तरी कुटुंबातील व्यक्ती थोडक्यात बचवल्या. मात्र यामुळे फर्निचरचे किरकोळ नुकसान झाले आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने कुटुंबीय खूप धास्तावले. या घटनेने सिडकोच्या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला असून रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

ध्वजारोहण न झाल्याने नागरिकांची नाराजी

मुरुड : प्रतिनिधी

15 ऑगस्ट रोजी मुरुड शहरातील आझाद चौकात ध्वज रोहन न झाल्याबद्दल शहरातील असंख्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडिया व आपापसातील चर्चेद्वारे ही नाराजी त्यांनी प्रकट केली होती.

जंजिरा संस्थांच्या लढ्यात आझाद चौक या ठिकाणाला खूप महत्व होते. आझाद चौकातूनच क्रांतीची मशाल तेवली जाऊन स्वातंत्र्याचे एक मोठे आंदोलन होऊन जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले होते. त्या काळापासून आझाद चौकात ध्वजारोहण होत होते. तद्नंतर सदरचे ध्वजारोहण हे नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष यांच्या हस्ते होऊ लागले. 15 ऑगस्ट रोजीचे ध्वजारोहण यंदा आझाद चौकात न झाल्याने मुरुड शहरातील असंख्य लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. सदरचे ध्वजारोहण न झाल्याने नगरपरिषदेच्या कारभारावर टीका करण्यात येत होती. याबाबत प्रस्तूत प्रतिनिधीने मुरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांना याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, कोरोना विषाणूचा जास्त प्रसार होऊ नये यासाठी शासनाने गर्दीच्या ठिकाणी ध्वजारोहण होऊ नये असे संकेत दिले होते. तहसील कार्यालयात तहसीलदार गमन गावीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शासनाच्या या सूचना निदर्शनास आणून दिल्या होत्या. शासकीय कार्यालयातच ध्वजारोहण व्हावे असे निर्देश दिले होते. जर आझाद चौकात ध्वजारोहण झाले नाही म्हणून कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी दिलगीरी व्यक्त करीत आहे. 26 जानेवारीचे ध्वजारोहण हे आझाद चौकातच होणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी केले आहे.

उलवे येथे रक्तदान शिबिर

पनवेल : वार्ताहर

लायन्स क्लब उलवे जेम्स आणि गोरक्षनाथ मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या हस्ते झाले. या उपक्रमास पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, लायन्स क्लबचे रिजनल चेअरमन संजय गोडसे, लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्सचे अध्यक्ष नंदकुमार ठाकूर, उपाध्यक्ष मिलिंद पाटील, गौरी देशपांडे सेक्रेटरी हेमंत लोणकर, खजिनदार दत्तात्रेय कोळी, तसेच पुंडलिक म्हात्रे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. नवी मुंबईतील तेरणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे या रक्तदान शिबिराला सहकार्य लाभले.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply