पनवेल : वार्ताहर
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात सोमवारी (दि. 18) सायंकाळी एक अर्धवट मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी पाहणी केली. पनवेल रेल्वेस्थानकाकडे जाताना उजव्या बाजूला सिडकोचे मोठे मैदान असून, त्याठिकाणी अज्ञात व्यक्तींनी छातीपासून ते डोक्यापर्यंतचा अर्धा मृतदेह फेकून दिला होता. याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी ही गोष्ट तातडीने पोलिसांना कळवली. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.