Breaking News

झुगरेवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

कर्जत : बातमीदार – जून महिन्यात सुरू होणारे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर महिना उजाडला तरी सुरू झाले नाही. हाताला काम नाही तिथं बाकीचे विषय गौण. सध्या ऑफलाइन अध्ययन सुरू आहे, पण शैक्षणिक साहित्याचे काय, हा प्रश्न झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांना सतावत होता. त्यांनी ही बाब ठाणे शहरातील श्रीरंग सोसायटीमधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या कविता कदम, तसेच एलआयसी डेव्हलपमेंट अधिकारी कदम, वीणा दवणे, ज्योती साळी यांच्या कानावर घातली. त्यांनी तातडीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमास कर्जत पंचायत समितीचे नवनियुक्त गट शिक्षणाधिकारी संतोष दौंड उपस्थित होते. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी आपले कायम सहकार्य असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

विद्यार्थीहिताला प्राधान्य देणारे झुगरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक तसेच नांदगाव गटाचे केंद्रप्रमुख गोविंद दरवडा, हरिश्चंद्र अढरी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण झुगरे, उपाध्यक्ष वसंत पारधी यांच्यासह गणपत केवारी, सुनील सावळा, शाळेचे शिक्षक घावट, चोरघे, आकाश शिवदे, सुरेश पवार, आनंद कराळे, संतोष कोरडे, प्रदीप सैदाने आदी कार्यक्रमास उपस्थित होते. ठाणे येथील दात्यांनी दिलेल्या शैक्षणिक साहित्यामुळे या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply