पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना पगार आणि निवृत्त शिक्षकांना वेळेवर पेन्शन मिळणार असून. सातवा वेतन आयोगही लागू होणार आहे. सत्ताधारी पक्ष याबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याने शिक्षक आणि निवृत्त शिक्षकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे.
पनवेल महापालिकेच्या 11 शाळांतील 74 शिक्षक, तीन शिक्षकेतर कर्मचार्यांच्या पगारासाठी आणि 94 सेवानिवृत्त शिक्षकांच्या पेन्शनसाठी राज्य शासनाकडून अनेक वेळा महापालिकेला अनुदान वेळेवर येत नाही. त्यामुळे शिक्षकांची व विशेषत: निवृत्तीधारकांची मोठी अडचण होते. कोरोना लॉकडाऊन काळात पेन्शन उशिरा मिळाल्याने अनेकांना औषधासाठी पैसे नसल्याने त्यांचे हाल झाले. या काळात शिक्षकांनीही घरोघरी फिरून सर्व्हेक्षणाची कामे केली, पण त्यांना पगार वेळेवर मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनादेखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले .
पनवेल महापालिकेने शिक्षक आणि निवृत्तीधारकांना भविष्यात अशा प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागू नये यासाठी राज्य शासनाचे अनुदान येण्यास वेळ झाल्यास महापालिकेच्या इतर कर्मचार्यांप्रमाणे त्यांनाही वेळेवर पगार व पेन्शन मिळावी याकरिता महापालिका फंडातून पैसे घेऊन शासनाकडून अनुदान आल्यावर ते फंडात जमा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. याशिवाय शासनाने ऑगस्ट 2019पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा जीआर काढला आहे. त्याबाबतच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात येऊन त्याला मंजुरी देण्यासाठी स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू होईल.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …