खोपोली : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे अंगारक संकष्ट चतुर्थीला (दि. 23) वरदविनायक मंदिर भक्तांसाठी चोवीस तास खुले ठेवण्याचा निर्णय महड येथील श्री गणपती संस्थान समितीने घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे दीड वर्ष खालापूर तालुक्यातील महड येथील वरदविनायक मंदिर बंद होते. घटस्थापनेला मंदिर खुले करण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर केल्यानंतर महड परिसरात छोटे व्यवसायिक तसेच ग्रामस्थांनी जल्लोष केला होता. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी पहाटेपासून भाविकांना दर्शनासाठी महडचे वरदविनायक मंदिर खुले राहणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे तसेच मंदिर व्यवस्थापनाने केलेल्या उपाय योजनांचे पालन करून वरदविनायकाचे दर्शन घ्यावे व व्यवस्थापनाला सहकार्य करावे
-मोहिनी वैद्य, कार्याध्यक्ष, श्री गणपती संस्थान, महड, ता. खालापूर