Breaking News

खोपोलीत भाजपतर्फे फळवाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

खोपोली : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे 14 ते 20 सप्टेंबर या सेवा सप्ताहादरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत खोपोली शहरात आदिवासी वाडीत तसेच दवाखान्यात व घरकाम करणार्‍या महिलांना भाजपतर्फे फळवाटप करण्यात आले.
उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पाटील यांचा अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यासाठी कार्यक्रम प्रमुख म्हणून स्वाती बिवरे, सहप्रमुख सुनीता पाटणकर यांना जबाबदारी देण्यात आली होती.
 या कार्यक्रम नगरसेवक तुकाराम साबळे, शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, महिला शहर अध्यक्ष शोभा काटे, माजी अध्यक्ष रसिका शेट्टे, सोशल मीडियाचे उत्तर रायगड जिल्हा सहसंयोजक राहुल जाधव, भाजप शहर सरचिटणीस हेमंत नांदे, दिलीप पवार, गोपाळ बावस्कर, चंद्राप्पा अनिवार,
प्रमोद पिंगळे, सचिन मोरे, संजय म्हात्रे, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर, अनिल कर्णूक, संतोष चौधरी प्रमोद वाघ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply