Breaking News

बायोमेडिकल वेस्ट पुन्हा रस्त्यावर; कळंबोलीतील प्रकार; रहिवाशांकडून कारवाईची मागणी

पनवेल : वार्ताहर

चार दिवसांपूर्वी पनवेलजवळील कर्नाळा स्पोर्टस् येथील रस्त्यावर बायोमेडिकल वेस्ट आढळले असतानाच पनवेल-सायन महामार्गाच्या अगदी बाजूला असलेल्या सिडकोच्या पाणी साठवून ठेवणार्‍या धारण तलावा लगत पुन्हा बायोमेडिकल वेस्ट टाकण्यात आल्याचे प्रकार समोर आल्याने येथील रहिवाशांनी संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे. औषधी व घातक कचरा रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी टाकला जात नाही. त्याची विल्हेवाट अतिशय योग्य प्रकारे लावावी लागते. माणसाच्या आरोग्याबरोबरच पर्यावरणासाठीही हा कचरा धोकादायक असतो. त्यामध्ये औषध आणि दवाखान्यात वापरलेले सलाइन, सुया, सिरिंज, हँड ग्लोव्ज, शिवाय इतर गोष्टींचा सामावेश आहे. हा कचरा हा वेगळा करणे बंधनकारक आहे. तशा अटीवरच हॉस्पिटल, छोटे दवाखाने यांना तालुका आरोग्य विभाग करून परवानगी दिली जाते. महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडूनही बायोमेडिकल वेस्ट हा वेगळा करण्याबाबत सूचना त्या रुग्णालयाबरोबरच, मेडिकल आणि औषध कंपन्यांना दिल्या जातात. पनवेल आणि सिडको कॉलनीमध्ये अनेक दवाखाने आहेत, तसेच मेडिकल आणि रक्त लघवी तपासणी बरोबरच एक्स-रे, एमआरआय, सिटीस्कॅन, सोनोग्राफी केंद्राचा समावेश असतो. वेगवेगळ्या रुग्णांचे ऑपरेशन या ठिकाणी केली जातात. त्यासाठी उपकरणे वापरली जातात. यापैकी वापरलेल्या वस्तू, तसेच औषध आणि वापरायोग्य नसलेल्या इतर मेडिकल अनेकदा रस्त्यावर आणि सार्वजनिक भागात फेकून दिले जाते. बायोमेडिकल वेस्ट उचलण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे काम देण्यात आले आहे. या कंपनीची गाडी दररोज पनवेल परिसरात येते आणि बायोमेडिकल वेस्ट होऊन जाते. त्याबाबत नोंदवह्या ठेवण्यात येतात, तसेच या कचर्‍याची वाहतूक, तसेच त्याचे डिस्पोजल करण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला पैसे द्यावे लागतात. ते वाचविण्याकरिता काही रुग्णालये, मेडिकल्स आणि औषधे, गोळ्या आणि इतर मेडिकल वस्तू रस्त्यावर फेकून देतात. त्यामुळे रहिवाशांच्या जिवीताचा प्रश्न निर्माण झाला असून अशांविरुद्ध तातडीने कारवाई संबंधित खात्याने करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी करीत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply