पनवेल : रायगड जिल्ह्यात 646 नव्या कोरोना रुग्णांची आणि 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 15) झाली, तर दिवसभरात 659 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 283, अलिबाग 81, माणगाव 53, रोहा 47, पेण 44, कर्जत 31, खालापूर 28, महाड 18, उरण 14, मुरूड 13, सुधागड व पोलादपूर प्रत्येकी 12, तळा व म्हसळा प्रत्येकी चार आणि श्रीवर्धन तालुक्यातील दोघांचा समावेश आहे; तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात पाच, अलिबाग चार, खालापूर, कर्जत, पेण, तळा, महाड व पोलादपूर तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 38,419 व मृतांची संख्या 1037 झाली आहे. जिल्ह्यात 30,818 जण कोरोनामुक्त झाल्याने 6564 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …