Breaking News

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, फळवाटप

रेवदंडा ः प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त भाजप युवा मोर्चा मुरूड तालुका यांच्या वतीने काशिद येथील मंदिराच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास जिल्हा शासकीय रक्तपेढीचे विशेष सहकार्य आणि योगदान लाभले. भाजप मुरूड तालुका तसेच भाजप युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची या वेळी उपस्थिती होती.

रक्तदान शिबिराचे आयोजन भाजप युवा मोर्चा मुरूड तालुका अध्यक्ष अ‍ॅड. रोहन खोपकर यांनी केले होते. रक्तदान शिबिरास भाजप जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते आणि भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी भेट दिली व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. या वेळी भाजप मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, प्रवीण बैकर, माजी तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी आदी भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरासाठी शासकीय रक्तपेढीच्या वतीने डॉ. दीपक गोसावी, हेमकांत सोनार, मनीषा नवले, प्रज्ञा पवार, सुरभी नागावकर, प्रिती जोशी, संकेत घरत, महेश घाडगे आदींसह भाजप तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, प्रवीण बैकर, भाजप मुरूड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अ‍ॅड. रोहन खोपकर व भाजप युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान शिबिरास काशिद ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.

भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून जिल्हा स्तरावर ठिकठिकाणी सामाजिक बांधिलकीचे स्तुत्य उपक्रम भाजप व भाजप युवा मोर्चाच्या वतीने राबविण्यात येत असल्याचे भाजप जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी या वेळी सांगितले.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना फळवाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोळघर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध सामाजिक बांधिलकीचे स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहेत.

भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्या हस्ते शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष अनंत पाटील, भाजप अलिबाग तालुका चिटणीस अमित पाटील, रविकांत पाटील, कोळघर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दिवाकर पाटील, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्वत्र सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यामध्ये विविध सामाजिक बांधिलकीचे स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्याचे भाजप तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे यांनी सांगितले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply