Breaking News

बिमा पाठशाला अॅप एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे

पनवेल ः वार्ताहर

शिक्षा सुरक्षा फाऊंडेशनच्या बिमा पाठशाला या अभिनव अ‍ॅपचे लाँचिंग विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, उद्योग आघाडी अध्यक्ष प्रदीप पेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बोरिवली येथे झाले.

आत्मनिर्भर भारत अभियानाच्या प्रेरणेने प्रत्येकाने विमा विषयात आत्मनिर्भर व्हावे या हेतूने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. अगदी छोट्या रकमेचे व गोरगरिबांना उपयुक्त असे विविध प्रकारचे विमा आणि त्याबद्दलचे ज्ञान या पाठशालेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर, कार्यक्रमाचे आयोजक प्रशांत कारुळकर, शीतल कारुळकर, भाजयुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद उकावले, उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष निलेश देशमुख आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply