Breaking News

अनधिकृतपणे मासेमारी करणार्या परप्रांतीयांवर कारवाई करण्याची मागणी

पनवेल ः प्रतिनिधी

कोकण किनारपट्टीवर अनधिकृतपणे परप्रांतीय मच्छीमारांकडून एलईडी दिव्यांचा वापर करून सुरू असलेल्या मासेमारीला आळा घालण्यासाठी अशा बोटींवर कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया सिफेरर्स अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियनच्या पदाधिकार्‍यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री अस्लम शेख व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली.

समुद्र किनारपट्टीपासून 12 नॉटिकल प्रदेश स्थानिक मच्छीमारांसाठी राखीव असताना परप्रांतीय मच्छीमारांकडून एलईडी दिव्यांचा वापर करून सुरू असलेल्या मासेमारीमुळे माशांचे साठे नष्ट होत आहेत तसेच स्थानिक पारंपरिक मच्छीमार बेरोजगार झाले आहेत. याबाबत ऑल इंडिया सिफेरर्स अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियनच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. 28) मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री अस्लम शेख व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले. शेख यांनी स्थानिक प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले. या वेळी युनियनचे अध्यक्ष  संजय पवार, कार्याध्यक्ष अभिजित सांगळे, संघटक पराग मुंबरकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष अफजल देवळेकर, नवी मुंबई कार्याध्यक्ष सुरेश चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply