Breaking News

पनवेल तालुक्यात आढळले 311 नवे रुग्ण

सहा जणांचा मृत्यू   280 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 2) कोरोनाचे 311 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 280 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 260 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 228 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 51 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 51 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल सोहम अपाटमेंट विरुपाक्ष मंदिराजवळ, कामोठे सेक्टर 18, कळंबोली सेक्टर 3, कळंबोली येक्टर 10 येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 25 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3121 झाली आहे. कामोठेमध्ये 74 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4350 झाली आहे. खारघरमध्ये 50 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 4350 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 50 नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 3691 झाली आहे. पनवेलमध्ये 53 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3450 झाली आहे. तळोजामध्ये आठ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 789 झाली आहे. 

पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 19751 रुग्ण झाले असून 17483 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.52 टक्के आहे. 1832 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 436 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात 18 जणांना लागण

उरण : तालुक्यात शुक्रवारी 18 जणांना कोरोनाची लागण झाली असून 10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये नयन अपार्टमेंट बाजारपेठ तीन, कामठा, नेवल स्टेशन करंजा, पिरकोन प्रत्येकी दोन, खोपटे देऊळपाडा, कासमघाट, डाऊरनगर समाजमंदिर, म्हातवली नागाव, साईबाबा मंदिर द्रोणागिरी, पोलीस स्टेशन, नागाव, बोरी, फुंडे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

कर्जतमध्ये 11 कोरोना पॉझिटिव्ह

कर्जत : तालुक्यात शुक्रवारी 11 रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 1652 वर गेली असून त्यापैकी 1457 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आढळलेल्या रुग्णांत नेरळ नजीकच्या मोहाची वाडी तीन, मुद्रे बुद्रुक दोन, कर्जत शहर, दहिवली कोंकण आळी, माथेरान, सालपे, कोंदिवडे, धामोते येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

महाड तालुक्यात 12 नवे बाधित

महाड : तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे नवे 12 रुग्ण आढळून आले असून पाच जणांनी कोरोनावर मात केली. आढळलेल्या रुग्णांमध्ये चांढवे पाच, प्रभात कॉलनी, कांबळे, खैरे, मुठवली, चोचिंदे, विरेश्वर मंदिर, धरनाची वाडी वरंध येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply