उरण : वार्ताहर – श्री छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान व शिवप्रतिष्ठान, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था-उरण महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील कोप्रोली येथील जिल्हा परिषद शाळेत कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कोरोना काळात कार्य केलेल्या डॉक्टर, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदींचा कोरोना योद्धा म्हणून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर, अध्यात्मिक क्षेत्रातील चंदन महाराज, रायगड भूषण राजू मुंबईकर, डॉ. मनोज भद्रे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पंडित तर आभार प्रदर्शन सुनील वर्तक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक संस्थांच्या पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.