पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 465 नव्या कोरोना रुग्णांची आणि 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 2) झाली, तर दिवसभरात 449 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 260 व ग्रामीण 51) तालुक्यातील 311, अलिबाग 40, पेण 31, उरण 18, महाड 12, कर्जत 11, खालापूर 10, रोहा आठ, माणगाव सात, पोलादपूर पाच, सुधागड चार, म्हसळा तीन, मुरूड व श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि तळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल (मनपा चार, ग्रामीण दोन) तालुक्यात सहा, अलिबाग चार आणि रोहा तालुक्यात एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 46,674 आणि मृतांची संख्या 1302 झाली आहे. जिल्ह्यात 42,356 जण कोरोनामुक्त झाल्याने 4016 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper