Breaking News

केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येणार

अनंत गीते यांचा ठाम दावा

रोहे : प्रतिनिधी : मी अटलजींच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. आज नरेंद्र मोंदीच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे. आज सरकारही भाजप सेना युतीचे आहे. यापुुढेही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात आमचेच सरकार येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी रोहे येथे  केले.

32  लोकसभा मतदारसंघाचे रायगड व रत्नागिरीचे उमेदवार अनंत गीते यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ रोहा तालुक्यातील सोनगाव येथे जाहीर सभा घेऊन फोडला या वेळी ना. गीते बोलत होते.

या वेळी राजिप सदस्य किशोर जैन, समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, नरेश गावंड, भाजप रायगड जिल्हा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, भाजप तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव साळवी, कोळी समाज जिल्हा अध्यक्ष जयवंतराव पोकळे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीता हजारे, विभागप्रमुख संतोष खेरटकर, कामगार सेल अध्यक्ष अ‍ॅड. हर्षद साळवी, ग्राहक संरक्षण कक्षप्रमुख अनिष शिंदे, कोळी समाज तालुका अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, नीलेश वारंगे, भाजप नेते शैलेश रावकर, अरुण वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी किशोर जैन यांनी त्यांच्याच होमग्राऊंडवर सोनगाव येथे आमची सभा होत आहे. तेवढीच मोठी सभा त्यांनी सोनगाव येथेच घेऊन दाखवावी, असे आवाहन करीत रोहा तालुक्यात आम्ही मागच्यापेक्षा जास्त आघाडी घेणार असल्याचे सांगितले. संजय कोनकर यांनी राष्ट्रवादी पक्षाने कोणताच विकास केला नाही. याउलट आम्ही उडदवणे भागाला जोडणारा पालदाड पूल मंजूर करून आणला. भाजप, सेना युतीनेच तालुक्यात सर्वाधिक काम केल्याचे सांगितले.

 समीर शेडगे यांनी सोनगाव हे विजयी मैदान आहे, गेल्या निवडणुकीत येथूनच प्रचाराला सुरुवात केली आणि आपला विजय झाला. या वेळीही येथूनच प्रचाराला सुरुवात केली असल्याने आमचा विजय निश्चितच आहे. ही लढाई सदाचारी विरुद्ध भ्रष्टाचारी असल्याचे सांगितले. या वेळी अमित घाग यांनी आमच्याच सरकारने भाताला भाव दिला असल्याचे संगितले.

या वेळी अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेस मोठ्या प्रमाणात युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply