Breaking News

सोनगाव रस्त्याची अजूनही दुरवस्था

रोहे ः प्रतिनिधी : रोहे तालुक्यातील पिंगळसई विभागातील सोनगाव, धामणसई, गावठण याकडे जाणारा मुख्य रस्ता डॉ. सी. डी. देशमुख ते या गावांपर्यंत असलेला रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असून हा रस्ता कधी होणार या कडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे.

या रस्त्याचे काम सुरू झाले खरे, पण  फक्त 2 किमीपर्यंतच झाल्याने या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे उर्वरित रस्ता कधी  करणार, असा सवाल या भागातून विचाराला जात आहे.

पिंगळसई ते खांब हा रस्ता ग्रामसडक योजनेतून झाला, पंरतु दुसरा या गावांना जोडणारा सगळ्यात जवळचा असलेला रेल्वे स्टेशन पलीकडील डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालय, रोहिदास नगर ते थेट सोनगाव, गावठाण, धामणसई या गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून या मार्गावर 2 किमीपर्यंत

नवीन चांगला रस्ता झाला आहे. हा अपवाद सोडल्यास आन्य रस्ता अत्यंत खराब आहे. त्यामुळे सायकल, दुचाकी ते चारचाकी गाड्यांनी प्रवास करणार्‍या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.हा रस्ता पूर्ण कधी होणार, असा सवाल या विभागातून विचारला जात आहे.

रेल्वे गेट सोडल्यानंतर डॉ.सी. डी. देशमुख महाविद्यालय ते मंदिरापर्यंतचा रस्ताही अत्यंत खराब झाला आहे. रात्री प्रवास करण्यासारखा रस्ताच नाही, परंतु नोकरदार याच रस्त्याने प्रवास करीत असतात. हा रस्ता सर्वात आधी होण्याची आवश्यकता आहे.सारेच राजकीय नेते या विभागात सभा झाल्या की आश्वासने देतात. या रस्त्याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे. कोणत्याही पक्षाने हा रस्ता करा, पण हा रस्ता झालाच पाहिजे अशा भावना नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply