माणगाव : प्रतिनिधी : सचराज प्रॉडक्शनचे ‘कशा बिलगल्या वेली’ हे अल्बम गाणं संगीत मराठी या म्युझिक चॅनेलवर येत आहे. विशेष म्हणजे यातील सर्व कलाकार माणगावातील आहेत. सर्वसामान्य माणसाला चॅनेलपर्यंत जाण्यासाठी यशराज प्रॉडक्शनचा हा उपक्रम आहे. चित्रपट गीते, अल्बम गाणं, प्री वेडिंग साँग, आफ्टर वेडिंग साँग बनवण्यासाठी यशराज प्रॉडक्शन यांची निर्मिती उपयुक्त ठरणार आहे. कशा बिलगल्या वेलीचे गीतकार सायराबानू चौगुले असून त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे, संगीतकार सचिन आव्हाड हे असून त्यांचेही यापूर्वी अल्बम प्रसिद्ध झाले आहेत.
हे गाणं सचिन आवड यांनी व दीक्षा देसाई यांनी पुण्याच्या नामवंत स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केले आहे, प्रेक्षकांना नक्कीच आवडणारं गाणं असेल, असे सचिन आव्हाड यांनी सांगितलं. हे रोमँटिक गाणं दिवेआगरच्या निसर्गरम्य बीचवर शूट करण्यात आले असून माणगावमधील कलाकार राजेंद्र पोवार, साधना पोवार यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. सर्वसामान्य माणसाला आपले छंद जोपासता यावेत, त्यांनाही संधी मिळावी यासाठी स्वतःपासून या गाण्याची सुरुवात करून नवोदित कलाकारांना, तसेच उपेक्षित कलाकारांना या प्रॉडक्शनमुळे फायदा होईल, असे
उपक्रमशील कलाकार राजेंद्र पवार व सचिन आव्हाड यांनी सांगितलं.