पनवेल ः वार्ताहर – पनवेल परिसरात मोटरसायकली चोरणार्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड करून त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, पोहवा. आयरे, पोना. परेश म्हात्रे, विनोद पाटील, राऊत, पोशि. गर्दनमारे, घुले, परासुरे, खेडकर, चौधरी, पवार आदींचे पथक ठिकठिकाणी गस्त घालत असताना सराईत मोटरसायकल चोर हा पनवेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून निलेश लक्ष्मण कातकरी (21) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत.