Breaking News

कोरोना काळात सुरक्षित दिवाळी साजरी करा -माजी खासदार संजीव नाईक

नवी मुंबई : बातमीदार – सध्या कोरोनाची महामारी सुरू असल्याने नागरिकांनी ही दिवाळी सुरक्षा बाळगून व स्वतःची काळजी घेऊनच साजरी करावी, असे आवाहन माजी खासदार संजीव नाईक यांनी केले आहे. भाजप व शिवराजे मित्र मंडळाचे अध्यक्ष परशुराम ठाकूर व समाजसेवक केशव ठाकूर यांच्याकडून दिवाळीनिमित्त स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्याचे वाटप कोपरी गाव सेक्टर 26 येथे करण्यात आले. त्याचे उद्घाटन माजी खा. संजीव नाईक यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी माजी खासदार नाईक यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना कोरोनात सुरक्षेचे नियम पाळण्याचे व सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. पालिकेला सर्वतोपरी सहकार्य करा, असेदेखील त्यांनी सांगितले. परशुराम ठाकूर व केशव ठाकूर यांच्याकडून दिवाळीसाठी लागणारे नऊ साहित्यांचे संच फक्त 351 रुपयांना देण्यात येत आहेत. तसेच  साहित्य घेणार्‍या प्रत्येक संचामागे एक कुपन देण्यात येणार आहे. त्यातून लकी ड्रॉ काढून बक्षीस देण्यात येणार आहे. अशी 15 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कोविडचे नियम पाळत हे वाटप करण्यात आले. 

महागाई वाढलेली असताना व कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती खालावलेली असताना स्वस्त दरात फराळ साहित्य देऊन अनेकांची दिवाळी गोड करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असल्याचे परशुराम ठाकूर व केशव ठाकूर यांनी सांगितले. या वेळी माजी नगरसेविका उषा भोईर, समाजसेवक पुरुषोत्तम भोईर, जाधव, ठाकूर, अक्षय ठाकूर, निलेश पालेकर, दिनकर ननवरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply