Breaking News

आमदार रविशेठ पाटील यांनी धरले एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांना धारेवर

राज्य महामार्गाचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश

सुधागड ः प्रतिनिधी
वाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम ठप्प आहे. या संदर्भात पाली विश्रामगृहात झालेल्या बैठकीत आमदार रविशेठ पाटील यांनी एमएसआरडीसीचे अधिकारी व ठेकेदारांना धारेवर धरले. त्यानंतर मंगळवार (दि. 24)पासून रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी सुधागड तालुक्यातील इतरही समस्यांचा आमदार पाटील यांनी आढावा घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीस भाजपचे दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मापारा, तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, सरचिटणीस संघटक सागर मोरे, केतन देसाई, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सरपंच रोहन दगडे, सरपंच भाऊ कोकरे, प्रसाद लखिमळे, चंद्रकांत गोफण, अरविंद फणसे, दक्षिण जिल्हा महिला उपाध्यक्ष सुचित्रा सावरगावकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष आरती भातखंडे, स्वरदा साने, योगिनी भातखंडे यांच्यासह  तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुधागडातील कळंब धनगरवाडी, अतोणे व इतर गावांतील धोकादायक विद्युत खांब बदलून नवीन बसविण्याची सूचना आमदार रविशेठ पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे महावितरणच्या अधिकार्‍यांना केली. मोडकळीस आलेल्या अंगणवाड्या दुरुस्तीसंदर्भात संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून लवकर प्रस्ताव पाठवून कामाचे नियोजन करावे. आमदार निधीतून रस्ते दुरुस्तीची कामे केली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply