मुंबई ः प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौरऊर्जा, इथेनॉल यांसारख्या क्षेत्रांत केलेले काम निश्चितच उल्लेखनीय आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले आहे.
रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौरऊर्जा, इथेनॉलसारख्या क्षेत्रांत केलेले काम निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचे कौतुक करायलाच हवे. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असेच काम होईल असा विश्वास आहे.
याबरोबरच कोरोना हे दुसर्या महायुद्धानंतरचे जगापुढचे सर्वांत मोठे आव्हान असून, याविरोधात निर्णायक कृती करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदीजींनी जी-20 परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला, असे सांगून आमदार पवार यांनी राज्यातूनही तशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …