Breaking News

उद्योगपती पी. पी. खारपाटील यांच्यासह असंख्य शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

उरण : प्रतिनिधी

चिरनेर येथील नामांकित उद्योगपती पी. पी. खारपाटील व राजेंद्र खारपाटील यांनी कुटुंबीय, तसेच असंख्य कार्यकर्त्यांसह शुक्रवारी (दि. 9) शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले.

चिरनेर हायस्कूल येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशात व राज्यात सत्तास्थानी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून, रायगड जिल्ह्यात भाजपचा झंझावात निर्माण करण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस महेश बालदी यांनी मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात मोठे योगदान दिले आहे. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाच्या पुढार्‍यांनी उरण मतदारसंघात विकासकामांकडे विशेष लक्ष दिलेले नाही, परंतु मागील विधानसभा निवडणुकीत पराजित होऊनही महेश बालदी यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून विकासकामे केली असल्याचे या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले. भाजपमध्ये प्रवेश करणारे कंत्राटदार पी. पी. खारपाटील यांनी चिरनेर येथील गरजू रुग्णांसाठी सुसज्ज अशा रुग्णालयाची निर्मिती करण्याची इच्छा व्यक्त केली. ती पूर्ण करण्याचे आश्वासन ना. चव्हाण यांनी दिले.

उरण तालुक्यातील घारापुरी येथे केबलद्वारे पाण्याखालून वीजपुरवठा, करंजा बंदर, उरण नगर परिषदेतील विकासकामे, शिवाय अन्य निधी आमदार नसतानाही पाठपुरावा करून मंजूर करून घेण्याचे काम आम्ही केले आहे. आता थांबायचे नाही. कार्यकर्त्यांनो, लढायचे आहे असे म्हणत ऑक्टोबरमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत एक लाख मते घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचा निर्धार महेश बालदी यांनी व्यक्त केला.

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध कल्याणकारी योजना राबविल्या असल्याचे सांगून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

या वेळी खारपाटील यांच्यासमवेत कोप्रोली येथील काँग्रेसचे तालुका सरचिटणीस मनोहर म्हात्रे, विंधणे येथील उद्योगपती वामन पाटील, चिरनेर येथील काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते महेंद्र ठाकूर, शेकाप लाल ब्रिगेडचे सुशांत पाटील, समीर डुंगीकर, ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी यांच्यासह विभागातील शिवसेना, काँग्रेस व शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या सर्वांचे मान्यवरांनी स्वागत केले.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply