Breaking News

होपमिरर फाउंडेशनतर्फे मोफत नेत्र तपासणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

होपमिरर फाउंडेशनने स्वातंत्र्य दिनानिमित्त सार्थ नेत्रालय आणि प्रहार ऑप्टिकल यांच्या सहकार्याने धानसर गावात गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि निराधारांसाठी मोफत चष्मे वाटप करण्यात आले, तसेच गरजूंना डोळ्यांच्या सर्व शस्त्रक्रियांवर सवलत देण्याचे ठरवले. या मोहिमेद्वारे होपमिरर फाउंडेशनने गरजूंना त्यांच्या डोळ्यांच्या समस्यांसाठी मदत केली. या मोहिमेचा सर्व ग्रामस्थांना लाभ झाला. या वेळी होपमिरर फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष रमजान शेख, अक्रम शेख, आशिष कदम, मौज्जम शेख, अरमान शेख, सार्थ नेत्रालयाचे वैभव बांदल, कुलदीप दामगुडे विनया पाटील, प्रहार ऑप्टिकल चे नारायण आडे  आणि  धानसर गावचे इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply