Breaking News

पनवेलमधून महिला बेपत्ता

पनवेल : वार्ताहर

पती बरोबर झालेल्या किरकोळ वादातून रागाच्या भरात त्याची पत्नी तीच्या चार वर्षीय मुलाला घेवून कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर

पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सिमरन विजेंद्र केसला (वय 24 वर्ष), गृहिणी राहणार नं. 402 आय विंग, माणिक नगर पनवेल या ठिकाणी राहत आहे. हि महिला नुकतीच गांधी गार्डन पनवेल येथून तिच्या पतीशी घरात झालेल्या किरकोळ वाद झाल्यामुळे ती कोणास काही न सांगता तिचा मुलगा धुर्व (वय 4 वर्ष) याला सोबत घेऊन गांधी गार्डन पनवेल येथून निघून गेली असल्याची तक्रार विजेंद्र सुरेश केसला यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता

झाल्याची तक्रार नोंदविली आहे.

या महिलेची उंची पाच फूट, डोक्याचे केस काळे, नाक बसके, अंगाने मध्यम, चेहरा गोल, रंग गोरा, बोली भाषा मराठी व हिंदी, अंगामध्ये नारंगी रंगाचा पंजाबी ड्रेस व निळ्या रंगाची ओडणी, तिच्या सोबत मुलगा वय 4 वर्ष रंग सावळा, अंगात काळ्या

रंगाचा टीशर्ट, व निळ्या रंगाची पॅन्ट अशा वर्णनाची महिला व लहान मुलगा कोठेही नजरेस पडल्यास किंवा माहिती मिळाल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पोलीस नाईक यु. बी. पाटील यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल …

Leave a Reply