Breaking News

बोर्झे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

पेण : प्रतिनिधी

पेण मधील सात ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य पदासाठी निवडणुका होणार असून सोमवारी (दि. 28) भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील व भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोर्झे ग्रामपंचायत मधील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. या वेळी प्रभाग क्र. 1 मध्ये मयुरी मदन ठाकूर, प्रभाग क्र.3 मध्ये पद्माकर अंबाजी पाटील, सुषमा निलेश पाटील, रुपाली योगेश म्हात्रे यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी एम. आर. पाटील यांच्याकडे दाखल केले. या वेळी बोर्झे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय ठाकूर हे उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply