गाझियाबाद : उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर येथे रविवारी (दि. 3) स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळून 21 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. अंत्यसंस्कारासाठी आलेले नागरिक पाऊस आल्याने छताखाली उभे राहिले असताना ही दुर्घटना घडली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अनेक जण ढिगार्याखाली दबले गेले असल्याने बचावकार्य हाती घेण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करून याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …