पेण : प्रतिनिधी
डास निर्मूलनासाठी पेण शहरात नगरपालिकेच्या वतीने धूरफवारणी आणि गटारात ऑईल टाकण्यास सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते अनिरुध्द पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी अंकिता इसाळ, शिवाजी चव्हाण 10 कर्मचार्यांच्या सहाय्याने डास निर्मूलन मोहीम राबवित आहेत.
पेण शहरातील ओला व सुक्या कचर्याचे व्यवस्थापन करण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी सांगितले.