Breaking News

लग्नाच्या वाढदिवशी पैसे खर्च न करता गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यातील घोटगाव येथील भाजप कार्यकर्ते तथा समाजसेवक हरिदास गजानन पाटील यांनी रविवारी (दि. 10)त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च न करता त्या रकमेचे म्हणजे 30 हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. हे वाटप खानाचा बंगला (वावंजे) पनवेल येथील 50 गरजू कुटुंबाना केले.

खानाचा बंगला येथील शाळेच्या सहकार्याने हे वाटप करण्यात आले. या वेळी हरिदास गजानन पाटील, त्यांच्या पत्नी सुनीता हरिदास पाटील व कुटुंबीय, शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद म्हात्रे, अर्चना देठे, रेखा पाटील आदी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने जानू वाघे यांनी या दाम्पत्यास लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply