Breaking News

दिलासादायक! नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी; मृत्यूदरातही घट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. रुग्णवाढीचा दर कमी झाला असून मृत्यूदरही नियंत्रणात आला आहे. शून्य मृत्यूदराचे उद्दिष्टही दृष्टिपथास येऊ लागले आहे. सक्रिय रुग्णांची टक्केवारीही 1.57 एवढी कमी झाली. शहरात 12 मार्च 2020ला पहिला रुग्ण आढळला. मार्चमध्ये फक्त 10 रुग्ण होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. एप्रिलपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. ऑगस्टमध्ये सर्वाधिक 10,764 जणांना लागण झाली होती. सप्टेंबरमध्येही 10,524 जणांना प्रादुर्भाव झाला. जुलैमध्ये सर्वाधिक 207 जणांचा मृत्यू झाला होता. नोव्हेंबरपासून रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. डिसेंबरमध्ये 2,751 जणांना लागण झाली व 67 जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारीमध्ये 18 दिवसांत फक्त 1,198 जणांना लागण झाली असून मृतांचा आकडा फक्त 24 आहे. सद्यस्थितीमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 820 असून ते प्रमाण फक्त 1.57 एवढेच आहे. रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण तब्बल 637 दिवसांवर पोहचले आहे. महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होत आहे. यामध्ये नागरी आरोग्य केंद्रांची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे. मनपा आयुक्त अभिजित बांगर हे स्वत: नागरी आरोग्य केंद्रांशी नियमित संवाद साधत आहेत. कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.

महापालिकेच्या मोहिमांना यश

नवी मुंबई महानगरपालिकेने ब्रेक द चेन व शून्य मृत्यूदर मोहीम सुरू केली आहे. या दोन्ही मोहिमांना यश येत आहे. शहरातील प्रत्येक नोडमधील रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. जानेवारीतील तीन दिवसांत एकही मृत्यू झाला नाही.

कोरोनाचा आलेख

महिना     रुग्ण मृत्यू

मार्च       10        01

एप्रिल         220              04

मे             1,974      68

जून           4,401      138

जुलै           8,780     207

ऑगस्ट        10,764      170

सप्टेंबर        10,524      162

ऑक्टोबर      7,848       151

नोव्हेंबर        3,730     83

डिसेंबर        2,751            67 जानेवारी         198            24

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply