
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप सोशल मीडिया सेल कोकण-ठाणे विभागीय पदाधिकार्यांची बैठक प्रदेश संयोजक प्रवीण अलाई, सहसंयोजक समीर गुरव, आयटी सेल प्रदेश प्रमुख सतिश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 20) पनवेलमध्ये झाली.
या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली तसेच मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संघटक अविनाश कोळी, सोशल मीडिया कोकण-ठाणे विभाग संयोजक अभिजित पेडणेकर, सहसंयोजक विशाल शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीचे नियोजन पनवेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते व उत्तर रायगड जिल्हा संयोजक प्रसाद मांडेलकर यांनी केले.