
पनवेल : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील दापोली येथे गोवर्धन डाऊर यांनी गौरव इंटरप्रायझेसचे कार्यालय सुरु केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. गौरव इंटरप्रायझेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, सुभाष म्हात्रे, अनिकेत जितेकर, गोवर्धन डाऊर, दिनेश म्हात्रे, बी. ए. म्हात्रे, राजा पाटील, भगिरथ जितेकर, बबन म्हात्रे, रोशन जितेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.