Breaking News

चिरनेरच्या वनसंपदेची वणव्यांत होरपळ

परिसरात आगी लावण्याचे सत्र सुरू

वनविभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील पूर्व भागातील डोंगरांना वणवे लावण्याचे धाडसत्र समाज कंटकांकडून सालाबादप्रमाणे सुरूच आहे. असाच वणवा सोमवारी दुपारच्या सुमारास चिरनेर परिसरातील टाकीगाव बस थांब्या जवळील निरुपणकार स्वर्गीय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन करण्यात आलेल्या टेकडीला लावण्यात आला होते. मात्र श्री दास्यांच्या सतर्कतेमुळे अज्ञातांनी लावलेला वणवा विझविण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक उपयुक्त वृक्षे आगीत होरपळून उद्धवस्त होण्यापासून वाचली आहेत.

सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी वृक्ष लागवड करण्यासाठी वापरीत आहे. अनेक संस्था ही वृक्ष लागवड करीत आहेत. डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धनाचे काम या भागात करीत आहे. अनेक श्री दास येथील झाडांना पाणी घालण्याबरोबर त्यांची मशागत करण्याचे काम आणि त्या झाडाची देखभाल करण्याचे काम आपल्या मुला बाळांप्रमाणे करीत आहेत, मात्र काही समाज कंटकांकडून अशा प्रकारचे आगीचे वणवे लावण्याचे काम करीत आहेत. ही लावण्यात आलेली आग बाजूला असलेल्या क्रेशर कॉरीच्या बाजूने लावली होती. तेथील टेकडीवरील झाडेझुडपे जळून खाक झाली.

त्यामध्ये लहान – सहान पशु पक्षांची घरटी व अंडी होरपळून उध्वस्त होत आहेत. आगीने मोठा भडका घेतला होता, दुसर्‍या टेकडीवर ही आग पोहचली होती. त्या टेकडीवरील हजारो झाडे जळून खाक झाली असती, मात्र या परिसरातील काही श्री दास तेथे पोहचुन आग विझविण्यात आली  त्यांच्या सतर्कतेमुळे अनेक वृक्षे जळण्यापासून वाचविली आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. परंतु अशा प्रकारच्या आगी लावण्याचे काम जे समाज कंटक करीत आहेत त्यांच्या बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी जाणकारांकडून करण्यात येत आहे.

राज्य शासनाने घटनांकडे गांर्भीयाने पाहावे

चिरनेर परिसरातील जंगलांमध्ये अनेक वेळा काही समाजकंटकांनी आगी लावण्याचे प्रकार केले आहे. या प्रकारांवर वेळीच आळा घातला गेला पाहिजे. अन्यथा येथील येथील वनसंपदा धोक्यात येईल. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने येथील घटनांकडे गांर्भीयाने पाहावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply