Breaking News

गिलने प्रतिभा आणि दर्जा सिद्ध केला -लक्ष्मण

बंगळुरू : वृत्तसंस्था

भारत-इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका रंगणार असून, या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा किंवा अजिंक्य रहाणे यांच्यापेक्षाही युवा खेळाडू शुभमन गिल या खेळाडूबद्दल चर्चा रंगेल, कारण त्याच्या फलंदाजीतील प्रतिभा आणि दर्जा त्याने वेळोवेळी दाखवून दिला आहे, असे मत भारताचा माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने व्यक्त केले आहे. लक्ष्मण म्हणाला, मला असे वाटते केवळ कसोटी क्रिकेटच नव्हे तर तीन्ही फॉरमॅटमध्ये ज्या खेळाडूची चर्चा होईल तो खेळाडू म्हणजे शुबमन गिल. मी असे म्हणतोय त्यामागे ठोस कारण आहे. आयपीएल असो, भारत-अ संघ असो किंवा पंजाबकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणे असो त्याने आपला खेळ दाखवला आहे. त्याच्या कामगिरीत सातत्य आहे. काही खेळाडूंना त्याच्या आधी संधी मिळाली, पण तो शांतपणे त्याच्या संधीची वाट पाहत राहिला आणि अखेर संधी मिळाल्यावर त्याने त्या संधीचे सोने केले. मला गिलबद्दल सर्वांत आवडलेली गोष्ट म्हणजे कठीण प्रसंगी तो मैदानावर डगमगला नाही. ऑस्ट्रेलियाच्या हेजलवूड, स्टार्क आणि कमिन्ससारख्या वेगवान गोलंदाजांसमोर सलामीला खेळायचे हे सोपे नाही. त्यातही 36 वर संघ बाद झाल्यानंतर पुढच्या सामन्यात आपली शैली टिकवून खेळ करणे हे खूपच उत्तम होते. त्याने त्याच्यातील प्रतिभा दाखवून दिली आणि त्यामुळेच त्याच्या तशा खेळीची चर्चा झाली, असेही लक्ष्मण म्हणाला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply