उरण ः वार्ताहर
येथील उरण मेडिकल वेल्फेअर असोशिएशनच्या सर्व डॉक्टरांना सोमवारी (दि. 1) फेब्रुवारी रोजी कोविड लस देण्यात आली. या सरकारच्या उपक्रमांत 80 डॉक्टरांना हि लस देण्यात आली. या वेळी डॉक्टरांनी नागरिकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन केले.
जनसामान्यांच्या मनात सध्या कोविड लसीकरणाबाबत खूप संभ्रम आहे. त्यासाठी उरणच्या डॉक्टरांनी आवाहन केले की, हि लस सुरक्षित असून तिचे काही दुष्परिणाम नाहीत. तरी सर्वांनी हि लस घ्यावी व समाजाला आणि देशाला या आजारापासून मुक्त करावे. आजचा ही लसीकरण मोहीम डीसीएचसी उरण येथे पार पडली.
या वेळी असोशिएशनचे पेटरान डॉ. सुरेश पाटील, डॉ मंगेश डाके, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे, उरण मेडिकल वेल्फेअर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. किरण मोरे, सेक्रेटरी डॉ. सत्या ठाकरे, डॉ. घनश्याम पाटील, डॉ. संजीव म्हात्रे आदी सदस्य उपस्थित होते.