बेंगळुरू : वृत्तसंस्था द्विशतकी आव्हान उभारूनही गोलंदाजांनी नांगी टाकल्याने बेंगळुरूला कोलकात्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला. यामुळे सहाजिकच कर्णधार विराट कोहलीचा पारा चढला असून त्याने लढतीनंतर प्रतिक्रिया देताना गोलंदाजांची चांगलीच खरडपट्टी काढली, अशी सुमार गोलंदाजी केल्यानंतर सहाजिकच पराभव पत्करावा लागणार… अन् तुम्ही तळ गाठणार, असे विराट कडाडला. बेंगळुरूच्या 206 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याने 24 चेंडूंत 66 धावा कुटल्या त्या आंद्रे रसेलच्या जिवावर. ‘पराभवाचे कारण अगदी स्पष्ट आहे… डावाच्या अखेरच्या चार षटकांत केलेल्या निष्प्रभ, सुमार मार्यामुळे पराभव पदरी पडला. हुशारी हवी, खेळात सफाई हवी, तरच यश मिळू शकते. यश गृहित धरून चालत नाही,’ विराट आपली नाराजी व्यक्त करतो. यंदा बेंगळुरूला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येते आहे. याआधीच्या मोसमातही परिस्थिती फार वेगळी नव्हती. यंदा तर या संघाला सलग पाच लढती गमवाव्या लागल्या आहेत. त्यात शुक्रवारी हातातोंडाशी आलेला विजय हिरावल्याने तो संतापला. ’रसेलसारखा तडाखेबंद फलंदाजी करणारा समोर असेल, तर हिमतीने मारा करावा लागतो. ज्यापद्धतीने आम्ही शनिवारी मारा केला, ते बघता गोलंदाजांना मार बसणारच होता. अशी कामगिरी असेल, तर आमचा संघ तळालाच राहणार’, असे विराट म्हणाला.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …